🕒 1 min read
मुंबई:- महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले असून सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. शिवसेनेचे हे यश भाजपला पचलेले नाही. त्यामुळे भाजप नेते वारंवार ‘सरकार पडणार’चा जप करताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा” असं उत्तर देत राऊतांनी अधिक भाष्य करणं टाळलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नव्या कार्यकारिणीतून काँग्रेसचं सोशल इंजिनिअरिंग, मराठवाड्यात पक्ष मजबूतीवर भर
- पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आम्ही फुलं लावणार – राकेश टिकैत
- खा. इम्तियाज जलील, खा. फौजिया खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर निवड
- बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दले तैनात करा ; भाजपची मागणी
- पॉवरग्रीडचे कार्यालय फोडणाऱ्यांना 9 तासांत अटक; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
