मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
त्यातच आता श्रीसंत याने आयपीएलमधील लिलावासाठी नोंदणी केली आहे. 2013 साली आयपीएलमध्ये बेटिंगप्रकरणी श्रीसंतवर सात वर्षाची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये लिलावासाठी नोंदणी केली आहे.
आयपीएल साठी एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 283 परदेशी खेळाडू असून 814 खेळाडू हिंदुस्थानी आहेत. सर्वाधिक खेळाडू वेस्ट इंडीज असून त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
श्रीसंत आयपीएलच्या मैदानात उतरण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएल लिलावासाठी त्यानेही आपली नोंदणी केली असून त्याच्या लिलावासाठी 75 लाख पासून सुरूवात होणार आहे. यंदा सगळ्यांची नजर हनुमा विहारी आणि आणि चेतेश्वर पुजारा या दोन खेळाडूंकडे असणार आहे, कारण ऑस्ट्रेलिया विरोधात या दोघांनी चांगली कामगिरी बजावली होती. गेल्यावेळी दोघांचा आयपीलमध्ये लिलाव झाला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
- “मला भारतरत्न देण्याचं कॅम्पेन थांबवा, देशाच्या विकासात योगदान देता येतंय हे माझं भाग्य”
- कोरोनामुळे उशिरा मिळालेला विकास निधी; खर्चासाठी ३१ मार्चची मुदत
- ‘या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे,’ शेतकरी आंदोलनावर युनोचा सरकारला सल्ल
- “सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?”
- कोरोनामुळे उशिरा मिळालेला विकास निधी; खर्चासाठी ३१ मार्चची मुदत


