🕒 1 min read
मुंबई: ‘गावगुंड मोदी’ च्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) आणि भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. ‘गावगुंडांना गावगुंडच दिसणार आहे. मुळाच भाजपची काय अवस्था झाली आहे, लोकं हे पाहून हसत आहे. ज्याची बायको पळून जाते त्याचे नाव मोदी ठेवले जात आहे’ असे म्हणत नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मात्र भाजपने या वक्तव्यावरूनही नाना पटोले यांना निशाण्यावर धरले आहे.
नाना पटोले यांनी आरोप केलेल्या कथित गावगुंडाची बायकोही माध्यमासमोर आली आहे. ‘लग्नापूर्वी त्याने आपण पदवीधर असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर तो खोटे बोलत असल्याचे समजले, त्याची रोजची मारहाण व गावठी दारू विकणे या सवयीमुळे मला घर सोडणे भाग पडले असे गावगुंड मोदीच्या बायकोने म्हटले आहे. तर आता यावरूनच भाजपने पुन्हा एकदा नाना पटोले यांना निशाण्यावर धरले आहे.
गावगुंडानंच सांगितलं माझी बायको पळाली म्हणून माझं नाव मोदी. त्याच स्टेटमेंटला घेऊन भाजप बसलाय. देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत. भाजपचेच लोक पंतप्रधानांशी ही गोष्ट जोडून त्यांना बदनाम करतायत. माझे जेवढे पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा तुम्हाला जनताच पेटवेल: नाना पटोले pic.twitter.com/ngbnuAE65N
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) January 23, 2022
नाना पटोले यांनी गावगुंडानंच सांगितलं माझी बायको पळाली म्हणून माझं नाव मोदी. असे म्हटले आहे. मात्र भाजप आता त्याच स्टेटमेंटला घेऊन बसले आहे. देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत. भाजपचेच लोक पंतप्रधानांशी ही गोष्ट जोडून त्यांना बदनाम करत आहेत. त्यामुळे माझे जेवढे पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा तुम्हाला जनताच पेटवेल. असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पाल्यांना शाळेत पाठवणे जोखमीचे वाटत असेल तर पाठवू नये- आदित्य ठाकरे
- “लवकरच मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसणार”, विरोधकांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
- “पटोलेंचे वक्तव्य दारुड्या गावगुंडासारखे, मात्र त्यांनी कारवाईसाठी तयार रहावे”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- “वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा, बाबरी पाडली तेव्हा…”
- अखेर विरुष्काची मुलगी वामिका झळकली टीव्हीवर; फोटो व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
