मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले, पहाटेची सत्ता गेल्यामुळे भाजप पाण्यातील माशासारखा तडफडत आहे. राज्यातील सत्ता बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सत्ता बरखास्त करा, असा टोला नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
यावेळी नाना पटोले म्हणाले, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अडचणीत आला आहे. त्यावर भाजप का बोलत नाही? गुंडाची चर्चा त्या प्रवृत्तीचे लोक करतात. त्यावर मी बोलणार नाही. समोरचा व्यक्ती सांगतोय मग हे गुंड आहे का? असं सांगतानाच गुंडाला प्रेमाची भाषा कळत नाही. त्यामुळे गुंडाला मारणार असं मी म्हणालो. याचा अर्थ जीवे मारणार असा होत नाही. मूळ विषयाला बगल देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मी ज्या गावगुंडाबाबत बोललो होतो. तो सर्वांसमोर आला आहे. आता या विषयावर मी बोलणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
पुढे नाना पटोले म्हणाले, लोक भाजपला हसतात. त्याची बायको पळते, त्याच नाव मोदी ठेवलं जातं. बाकी काही राहिलं नाही आता. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांची लोकं आहोत. आमच्या मनात असे विचार येत नाहीत. त्यांच्याच मनात विचार येतात, असा टोलाही नाना पटोलेंनी भाजपला लगावला.
महत्वाच्या बातम्या
ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी- मुख्यमंत्री ठाकरे
“आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

