मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून लवकरच ते अॅक्शन मोडमध्ये दिसतील, असे आदित्य म्हणाले.
मागील अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे हे आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे कुठेच प्रत्यक्ष हजर राहू शकले नाही. त्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत होती. यावरून आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. यावेळी बोलत असतांना आदित्य ठाकरे म्हणाले की,’विरोधी पक्ष नेहमीच काही ना काही आरोप-प्रत्यारोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात, तसेच जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण फोकस केलेला बरा.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मुख्यमंत्री ठाकरेंची प्रकृती ठणठणीत असून लवकरच ते अॅक्शन मोडमध्ये दिसतील.’ तसेच शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात बोलत असतांना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नाही. याची नोंद पालकांनी घेतली पाहिजे. पालकांच्या आग्रहाखातर शाळा सुरू करण्यात आल्या आहे. रिस्क घेऊन मुलांना पाठवू नये.
महत्त्वाच्या बातम्या
ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी- मुख्यमंत्री ठाकरे
“वाघ असाल तर बंगालच्या वाघिणी सारखे लढा, बाबरी पाडली तेव्हा…”
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

