मुंबई : राज्य सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पाल्यांना शाळेत पाठविण्याचे बंधन पालकांवर नसल्याचे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांना जोखमीचे वाटत असेल तर त्यांनी मुलांना पाठवू नये, असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.
आजपासून (दि.२४ नोव्हेंबर) राज्याच्या काही भागांतील शाळा सुरू होत असताना मंत्री ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची स्थिती पाहून सोमवारपासून (दि. २४) इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
आदित्य म्हणाले, ‘कोरोना काळात गेल्या सातशे दिवसांपासून शाळा बंद असल्याने आता त्या सुरू केल्या जाणार आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्याबाबत बंधन घातलेले नाही. वर्ग भरल्यानंतर कोरोना पसरणार नाही, याची काळजी शाळा आणि पालकांनी घ्यायची आहे. कोरोनाचा संसर्ग जिथे वाढणार नाही, अशा भागांतील शाळा सुरू होतील. काही जिल्ह्यांत लगेचच शाळा उघडणार नाहीत.’ असे यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
याबाबत उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यातील कोरोना स्थिती पाहूनच महाविद्यालये उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, संबंधितांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडीही लक्षणे आढळून आल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
ज्यांना गद्दारी करायची त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी- मुख्यमंत्री ठाकरे
“आर.आर.आबांच्या स्वप्नांना तिलांजली”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून चित्रा वाघ आक्रमक
Oscar 2022 : सुर्याचा ‘जय भीम’ आणि मोहनलालचा ‘मरक्कर’ या वर्षीच्या ऑस्करच्या यादीत
पर्रीकरानंतर भाजपच्या ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांनी केली अपक्ष लढण्याची घोषणा
“विचार आणि उच्चारांत सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले नेते बाळासाहेब ठाकरे”


