🕒 1 min read
नवी दिल्ली : देशातील 7 राज्यामध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने एकाच खळबळ उडाली आहे. तर चार राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील चार राज्यात बर्ड फ्लूची नोंद झाली असून हिमाचल, एमपी , राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा हैदोस पाहायला मिळत आहे. तसेच कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता बर्ड फ्लूवरुन राजकारण सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन जोरदार निशाणा साधला आहे. आय. पी. सिंह यांनी मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाचा फोटो ट्विट केला आहे. तसेच “या माणसाचं काय करावं? पक्षांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले” असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावरून भाजपाचे राजस्थानमधील आमदार मदन दिलावर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. देशात बर्ड फ्लूचा फैलाव होण्यामागे शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे, असे विधान मदन दिलावर यांनी केलं आहे.
https://twitter.com/IPSinghSp/status/1347429231442030592?s=20
दिलावर म्हणाले की, शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेले शेतकरी दररोज चिकन, बिर्याणीसह अन्य लज्जतदार पदार्थांवर ताव मारत आहेत. पार्ट्या करत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूच्या फैलावाचा धोका सातत्याने वाढत आहे. देशात बर्ड फ्लू पसरवण्यामध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे. दिलावर यांनी शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांमध्ये दहशतवादीही लपून बसल्याचीही शंका व्यक्त केली. तसेच मोठ्या संख्येने रस्ता अडवून बसलेल्या आंदोलकांना आता सरकारने रस्त्यावरून उठवले पाहिजे अन्यथा बर्ड फ्लूसारखे घातक आजार फैलावून हे शेतकऱ्यांचे तथाकथित आंदोलन देशामध्ये मोठे संकट निर्माण करेल.
दरम्यान, परभणीत 3 दिवसांपूर्वी मुरुंबा तालुक्यातील 800 कोंबड्याचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याची माहिती समोर आली आहे. परभणी जिल्हा प्रशासनाने मृत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते. या नमुन्यांचे अहवाल आले असून मुरुंबा येथील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे या प्रयोगशाळेने सांगितले आहे. यामुळे राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आंदोलक शेतकऱ्यांकडून चिकन बिर्याणी खाऊन ‘बर्ड फ्लू’ पसरवण्याचं षडयंत्र; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे
- राज ठाकरेंची सुरक्षा कमी करणाऱ्या ठाकरे सरकार वरून सरदेसाईंवर झाले मेहरबान
- जनता जर महाविकास आघाडीने त्रस्त असेल तर हल्ला होऊ शकतो; भाजप प्रवक्त्याने वर्तविली शक्यता
- भारतीय चाहत्यांसह सेहवागनेही केलं ट्विटरवर रिकी पाँटिंगला ट्रोल
- सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही रिकाम्या हाती जाणार नाही; शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
