Share

जनता जर महाविकास आघाडीने त्रस्त असेल तर हल्ला होऊ शकतो; भाजप प्रवक्त्याने वर्तविली शक्यता

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी फडणवीस यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला होता. त्यानंतरसुद्धा त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वात लक्षणीय बाब म्हणजे राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.माजी खासदार नारायण राणे यांची देखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.

भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी देखील या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.भाजप नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा अर्थ आहे की ‘जमाव’ त्यांच्यावर हल्ला करणार नाही.महाविकास आघाडी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवणे याचा अर्थ आहे की ‘जमाव’ त्यांच्यावर हल्ला करु शकतो.शेवटी जमाव हा जनतेचा असतो.जनता जर महाविकास आघाडीने त्रस्त असेल तर हल्ला होऊही शकतो अशी शक्यता वाघ यांनी वर्तविली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!