नवी दिल्ली:- केंद्र सरकारच्या जाचक नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं गेल्या 47 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आज आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे शेतकऱ्यांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत अनेक बैठकी पार पडल्या. परंतु, या बैठकींमध्ये शेतकरी आंदोलनावर कोणताही तोडगा निघाला नाही. सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची शेवटची सुनावणी 17 डिसेंबर रोजी पार पडली होती.
दरम्यान, राजस्थानातील भाजप आमदार मदन दिलावर यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “देशभरात बर्ड फ्लूचा फैलाव व्हावा म्हणून आंदोलक शेतकरी चिकन बिर्याणी खातात,असं वादग्रस्त वक्तव्य मदन दिलावर यांनी केले आहे.
तसेच आंदोलन करणाऱ्या तथाकथित शेतकऱ्यांमध्ये दहशतवादी, चोर आणि लुटेरे असू शकतात. जे शेतकऱ्यांचे दुश्मन असू शकतात. हे सर्व जण मिळून देशाला बर्बाद करु पाहतात. जर सरकारनं आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न केला नाही तर बर्ड फ्लू वाढण्यासाठी हे लोक जबाबदार असतील, असंही रामगंज मंडीचे आमदार मदन दिलावर यांनी म्हटलं.
दरम्यान, शेतकरी संघटना आणि मोदी सरकारमध्ये 8 व्या फेरीतील बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकरी आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. उलट आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारला माघार घ्यावीच लागेल, आम्ही मोकळे हात घेऊन जाणार नाही, अस स्पष्ट केलंय. आता शेतकरी आणि सरकारमधील पुढील बैठक 15 जानेवारी रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- काळजी करू नका केंद्राची वाट न पाहता पोल्ट्री उद्योगाला हात देण्यात येईल – सुनील केदार
- मराठा आरक्षणासंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक
- काम कसे करायचे हे घरबशा मुख्यमंत्र्यांना सांगा,सल्ल्याची गरज त्यांना जास्त आहे : भातखळकर
- आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा
- धक्कादायक: ‘बर्ड फ्लू’मुळेच दगावल्या परभणीतील 800 कोंबड्या


