Share

व्यापाऱ्यांवरील ‘शास्ती’ करा विरोधात आमदार जैस्वाल यांचे नगरविकास मंत्र्यांना पत्र

Published On: 

औरंंगाबाद : महानगरपालिकेच्या वतीने व्यापारी अस्थापनांना शास्ती कर लावण्यात येणार असून या कराला शहरातील जिल्हा व्यापारी महासंघाने जोरदार विरोध केला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींची भेट घेवून शास्ती कर लावू नये अशी विनंती केली. व्यापाऱ्यांच्या मागणीस औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे.

महानगरपालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दुकानांना आस्थापना शुल्क आकारण्याचे (शास्ती) सुतोवाच केले असून त्याला जिल्हा व्यापारी महासंघाने कडाडून विरोध केला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची भेट घेवून त्यांच्यापुढे आपले गाऱ्हाणे मांडले.

तसेच आम्ही शासनाचे सर्व प्रकारचे कर भरत असतांना त्यात आणखी एका नवीन कराची भर का असा प्रश्न देखील व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी याची तात्काळ दखल घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांना व्यापाऱ्यांकडून आस्थापना परवाना शुल्क कर वसूल करू नका, हे शुल्क आकारण्यास माझा देखील विरोध असल्याचे पत्र दिले. तसेच व्यापाऱ्यांना मी तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले.

जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, उपाध्यक्ष सरदार हरिसिंग, विजय जैस्वाल,सचिव लक्ष्मीनारायण राठी, तनसुख झांबड, जयंत देवळाणकर, कमलेश झवेरी, गुलाम हक्कानी आदींनी लोकप्रतिनिधींची भेट घेवून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!