मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सोलापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चासाठी मंगळवेढ्यातुन सोलापूरला जात असलेल्या आ. समाधान आवताडे यांच्याबरोबर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मराठा समाजाला आंदोलकांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या.
या मोर्चात सहभागी होण्यासाठी जात असताना आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांना पोलिसांनी अडविले. तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर – पुणे महामार्ग रोखला. या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर टीका करत ही दडपशाही कशासाठी अशी विचारणा केली आहे.
काल वारकऱ्यावर कारवाई आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडीसरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील? pic.twitter.com/hA6IqAaAoS
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 4, 2021
‘काल वारकऱ्यावर कारवाई. आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडीसरकारच आरक्षण अपयश लोक कस विसरतील?’ असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.
दरम्यान, सोलापुरातल्या मराठा संघटनांच्या आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली. आक्रोश मोर्चाच्या आयोजकाचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. संचारबंदी झुगारुन सोलापुरातील अनेक आंदोलक मोर्चात सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘केंद्राचा कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा, आम्ही दुसरा आणणार’
- ‘भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणे चुकीचे, मोगलाईतही असे झाले नव्हते’, फडणवीसांचा घणाघात
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

