अमरावती : शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत मिळावी, या मागणीसह आक्रमक झालेल्या आमदार रवी राणा आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक वाद आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. नियोजन समितीच्या बैठकीत ठाकूर आणि आमदारा रवी राणा यांच्यात हा वाद झाल्याने याची चर्चा सर्वत्र सुरु झाली असून या दोघांतील वाद आता विकोपाला गेल्याचं स्पष्ट झालं आहे.
आमदार रवी राणा यांनी दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळावी, तसा ठराव जिल्हा नियोजन बैठकीत पास करावा अशी मागणी केली. त्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी नियोजन भवनाच्या बाहेरच कुजलेलं सोयाबीन जाळलं. यावेळी संत्रे, कुजलेलं सोयाबीन फेकून राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी केली. त्यानंतर नियोजन भवनात बैठक सुरू झाल्याबरोबर यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद झाला.
अमरावतीची ही संस्कृती नाही, अमरावतीचे काही लोकप्रतिनिधी वायफळ सारखे वागतात. आमदार रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी आहे. स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी करतात. सोयाबीन जाळून लोकप्रतिनिधींनी जे नाटक केलं ते फक्त नौटंकी होती. एखाद्या महिला लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्री सोबत एक आमदारांनी कसं वागावं हे ही माहीत नाही त्यांना. स्वतःला आधी आरशात पाहावं मग बोलावं, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल
- सर्वात आधी महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या हिंगोलीतच ‘आघाडीत बिघाडी’?
- कश्मिरा शाह, सुनिता आहुजा यांच्यात पुन्हा वाद..?
- मराठवाड्यातून ८ हजार विद्यार्थ्यांचा आयटीआयला प्रवेश
- तालुकाप्रमुखावर हल्ला प्रकरणी शिवसेना आक्रमक, तात्काळ कारवाई करण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
