औरंगाबाद : आयटीआय अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू असून आतापर्यंत औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली तसेच उस्मानाबाद, नांदेड, लातूर या आठ जिल्ह्यातील शासकीय आयटीआय महाविद्यालयात ८ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
आयटीआयला दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. यंदा शासकीय आयटीआय महाविद्यालयात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड या आठ जिल्ह्यातील एकूण ८२ शासकीय आयटीआय महाविद्यालयात यंदा १४ हजार ९४८ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहेत.
या जागांपैकी आतापर्यंत ८ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आयटीआय शासकीय महाविद्यालयात आतापर्यंत १४ हजार ९४८ जागांपैकी केवळ ५८. ६४ टक्के प्रवेश झाले आहेत. अजूनही ६ हजार १८३ जागा रिकाम्याच आहे. यासाठी सध्या प्रवेशप्रक्रिया अजूनही सुरू असून या जागा देखील भरल्या जातील अशी अपेक्षा महाविद्यालयाकडून व्यक्त केली जात आहे. या जागा भरण्यासाठी महाविद्यालयाकडून प्रतीक्षा केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- स्रेहलता वसईकरने ‘या’ कारणामुळे घेतला सोशल मीडियापासून दूर होण्याचा निर्णय
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

