Share

तालुकाप्रमुखावर हल्ला प्रकरणी शिवसेना आक्रमक, तात्काळ कारवाई करण्याची मागणी

Published On: 

परभणी : सोनपेठ येथे शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान पायघन यांनी सोनपेठ शहरातील एकात्मक बाल विकासाची ईमारत बेकायदेशीर पाडण्यात आली. ही बाब खासदार संजय जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली. या गोष्टींचा मनात राग धरून सोनपेठ शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर तालुका प्रमुखांना एकटे पाहून नऊ ते दहा जनांनी लोंखडी रॉड, काठ्यानी त्यांचावर अचानक हल्ला करून पळून गेले. या घटनेमुळे कायदा सुवेस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना तालुका प्रमुख यांना मारहाण करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी. अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच सोनपेठ शहरातील एकात्मिक बाल विकासाची ईमारत बेकायदेशीर रित्या पाडण्यात आली आहे त्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी. असे निवेदन सोमवारी मानवतचे तहसिलदार ज्ञानदेव फुफाटे यांना देण्यात आले.

या निवेदनाची दखल न घेतल्यास मानवत तालुका शहर शिवसेना, युवासेना यांच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख अनिल जाधव, शिवसेना उप तालुकाप्रमुख माणिकराव काळे, युवासेना जिल्हा प्रमुख दिपक बारहाते, सभापती शिवाजी उक्कलकर, उप सभापती शिवाजी हिंगे, सरपंच पिंटू निर्वळ आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!