Share

कश्मिरा शाह, सुनिता आहुजा यांच्यात पुन्हा वाद..?

Published On: 

मुंबई : अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. यातच अनेकदा गोविंदाची पत्नी सुनिता आणि कृष्णाची पत्नी कश्मिरा यांच्यातही बोलणी सुरु असते. नुकतच कृष्णा आणि कश्मिराला स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी पुन्हा एकदा कश्मिराने गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाबद्दल बोलली आहे.

दरम्यान कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाहला नुकतच मुलासोबत स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना गोविंदासोबत सुरु असलेल्या वादाबद्दल विचारण्यात आलं. यावेळी कश्मिरा सुनिता आहुजाबद्दल बोलतांना म्हणाली’गोविंदा खूप चांगले कलाकार आहेत. एक अभिनेता म्हणून मला ते आवडतात. याशिवाय मी दुसरं कुणाला ओळखत नाही. मॅनेजर्सबद्दल मी काही बोलत नाही.’ असं ती म्हणाली.

नुकत्याच झालेल्या कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदा आणि सुनिताने हजेरी लावली होती. मात्र या खास भागात शोचा हिस्सा असूनही कृष्णा अभिषेकने परफॉर्म करणं टाळणेच पसंत केले होते. तसे २०१६ सालापासूनच कश्मिरा आणि सुनिता आहुजा यांच्यात वाद सुरु आहेत. गोविंदाची पत्नी सुनिताने कश्मिराने गोविंदाची थट्टा केल्याचं म्हंटलं होतं. गोविंदा पैशांसाठी काम करतात असं कश्मिरा म्हटल्याचं समज सुनिता यांचा झाला होता. तर दुसरीकडे मुलगा आजारी असतानाही गोविंदा आणि सुनिता मुलाला पाहायला देखील आले नाहित, असा आरोप कश्मिराने त्यांच्यावर केला होता. यामुळे त्यांच्यातील कौटूंबिक खटके उडतच असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!