Share

त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये; नवाब मलिकांचे चंद्रकांत पाटलांना खडेबोल

Published On: 

मुंबई : सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना भाजप  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख एकेरी भाषेत केल्याने सर्वत्र  चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकेची झोड उठवण्यात आली.  यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवले नसल्याचे म्हंटले आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी चंद्रकात पाटलांना खडेबोल सुनावले आहे.

‘ठिक आहे, चंद्रकांत पाटील यांनी चूक मान्य केली. त्यांची जीभ घसरली होती आता पाय घसरला जाऊ नये याची काळजी घ्यावी’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पवारसाहेबांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी जास्त न बोलता वरील दोन वाक्यात बोलून चंद्रकांत पाटील यांचा सूचक समाचार घेतला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या त्यातील 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. महाराष्ट्राच्या विकासात पवार साहेबांचं योगदानच आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवले नाही.’ असे म्हणत आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!