🕒 1 min read
मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर साध्य महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय घमासान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असून मूळ मुद्दा बाजूला राहतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत आहेत. दरम्यान आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.
विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. ‘मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिवे लावले? राणे समितीने मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला. मराठा आरक्षणाच्या समितीचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हाती दिला गेला याचंच आश्चर्य वाटलं,’ असे चिमटे राऊत यांनी काढले.
‘मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्हाला पंतप्रधानांनी वेळ दिला नाही. आम्ही दोन वेळा मागितली होती, पण पंतप्रधानांनी आम्हाला वेळ दिली नाही. महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचे श्रेय जावू नये म्हणून केंद्र सरकारला टोलवाटोलवी करायची होती. श्रेयवादाचा मुद्दा केंद्र सरकारने जाणूनबुजून उभा केला आहे,’ असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मेटेंचे भाषण सुरू असताना पाऊस आला, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेचा दाखला देत म्हणाले..
- उद्धवा, अजब तुझे सरकार! कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण तर विनापरवानगी आ.मेटेंच्या मोर्चाला पोलिसांचे सरंक्षण
- आ.मेटेंची ग्वाही फक्त नावालाच, मोर्चाच्या सुरुवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- ‘गंगेतील मृतदेहांची चर्चा झाली, पण बीडच्या २२ मृतदेहांच्या विटंबनेवर शांत का?’
- ‘पोलिसांनी कायदा, सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे’, बंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या आ.मेटेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
