🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील आंबेडकर चौकात संयुक्त किसान मोर्चासह विविध पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद जनआक्रोश आंदोलन झाले. या आंदोलनामुळे चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली. आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंद ऐलान करण्यात आले होते. त्याअनुषंगाने देशभरात विविध ठिकाणी जनआक्रोश आंदोलन झाले. पिंपरी चिंचवड येथेही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना, संयुक्त कृती समिती जन आंदोलन संघर्ष समिती, महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले, ‘एफडीआय या गोंडस नावाखाली भांडवलदारांना सवलती देऊन गरीबांचे शोषण करणारी यंत्रणा पंतप्रधान मोदी – शहा यांचे सरकार उभी करीत आहे. भारतात उत्पादीत होणारे इंधन आणि आयात केलेले इंधन नफेखोरीच्या उद्देशाने एकाच दराने सरकार विकत आहे,’ असा आरोप अभ्यंकर यांनी केलाय.
पुढे ते म्हणाले, ‘भाजपाचे प्रवक्ते आणि बौध्दिक मवाली लोकं सोशल मिडीयात वाटेल ते खोटं बोलतात. वृत्तवाहिनींच्या चर्चांमध्ये देखील धडधडीत खोटं बोलतात. त्यांचे हे बदमाशीचे खेळ आता नागरिकांच्या लक्षात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते खोटं बोलतात तसेच त्यांचे प्रवक्ते देखील खोटं बोलतात. काँग्रेसच्या काळात काय झालं असं हे विचारतात. मोदी सरकार आता जे काय विकत आहे ते काँग्रेसनेच उभे केल आहे. आयता मिळालेला देश भाजपाने विकायला काढला आहे,’ असा गंभीर आरोप अभ्यंकर यांनी यावेळी भाजपवर केला.
महत्त्वाच्या बातम्या
- प्राप्तिकर विभागाची मोठी कारवाई; महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापे
- रावसाहेब दानवे ठेकेदाराला त्रास देत असल्याचे खुद्द मला नितीन गडकरी यांनीच सांगितले, खैरेंचा गौप्यस्फोट!
- भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला; रजनी पाटील यांनी मानले भाजप नेत्यांचे आभार
- राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठा अहंकार, गर्दीच्या कार्यक्रमांवरून एसपींना भेटणार-पंकजा मुंडे
- करुणा शर्मा प्रकरणावरून पंकजांची धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका; ‘एट्रॉसिटी हा दलितांसाठी कवच कुंडल, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
