Share

रावसाहेब दानवे ठेकेदाराला त्रास देत असल्याचे खुद्द मला नितीन गडकरी यांनीच सांगितले, खैरेंचा गौप्यस्फोट!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम हे रावसाहेब दानवे यांच्यामुळेच रखडले आहे. रावसाहेब दानवे रस्त्याच्या ठेकेदाराला त्रास देत असल्याचे खुद्द मला नितीन गडकरी यांनीच सांगितले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अशा प्रकारचा गौप्यस्फोट केल्याने येथील राजकीय वातावरण तापले असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. खैरे यांनी दानवे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. साजापूर-करोडी रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

शिवसेना-भाजप युती तुटल्यापासून आत्तापर्यंत खैरे यांनी अनेक वेळा दानवे यांच्यावर तोफ डागली आहे. मात्र यावेळी खैरे यांनी दानवे यांच्यावर गंभीर अशा स्वरूपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणात भाजप खासदारच रस्त्याचा ठेकेदार असूनही रावसाहेब दानवेंनी औरंगाबाद जळगाव महामार्गाच्या कामात व्यत्यय आणत या ठेकेदाराला त्रास दिल्याचे खैरे यांनी सांगितले.

साजापूर-करोडी येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत खैरे यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वीही त्यांनी रावसाहेब दानवेंवर टिका करतांना ‘माझ्या पराभवासाठी रावसाहेब दानवेंनी पैसे वाटले होते’, असा आरोप केला होता. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यापासून चंद्रकांत खैरे भाजपवर जोरदार टीका करतांना दिसून येत आहेत. त्यातल्या त्यात रावसाहेब दानवेंवर टिका करण्याची संधी ते कधीही सोडत नाहीत. राजकीय वर्तुळात याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!