🕒 1 min read
मुंबई : तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करत अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती बॉलिवूडमध्ये सक्रिय असून तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. आता रकुलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रकुलने असा फोटो का शेअर केला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे.
दरम्यान रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला हा फोटो तिच्या आगामी चित्रपटातील आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव ‘छत्रीवाली’ असे आहे आणि हा फोटो चित्रपटाचे पहिले पोस्टर आहे. हे पोस्टर थोडे हटके आहे. यामध्ये रकुलच्या हातात कंडोमचे पॅकेट दिसत आहे. हा फोटो शेअर करत रकुलने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच हे पोस्टर पाहून चित्रपटात रकुल कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
https://www.instagram.com/p/CWNFHcjIQF8/?utm_source=ig_web_copy_link
रकुलच्या या पोस्टवर कलाकरांसोबतच चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत.‘छत्रीवाली’ या चित्रपटाचे लखनऊ येथे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात ती एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चांगलीच चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हे तर आजारी सरकार, आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार!
- ‘आम्ही या आरोपांकडे…’, भाजपा प्रभारींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली…
- 28 युनियन आहेत, कुणाशी चर्चा करायची हे कामगारांनीच सांगावं- अनिल परब
- …त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले- झिशान सिद्दिकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

