🕒 1 min read
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बांद्रा पश्चिम भागातले काँग्रेस नेते झिशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रार करणारे एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिले आहे.
झिशान पत्रात म्हणाले आहेत की, ‘मुंबईत १४ नोव्हेंबर रोजी एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाई जगताप यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. मला धक्काबुक्की केली आणि शेकडोंच्या गर्दीसमोर माझा अपमान केला. त्यावेळी पक्षाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी मी काही बोललो नाही. पण माझी मागणी आहे भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.’
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसने मोदी सरकारविरोधात एका पदयात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेदरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, युथ काँग्रेसचे अध्क्ष झिशान सिद्दिकी आणि युवा नेता सूरज सिंह ठाकूर यांच्यात राजगृहामध्ये जाण्यावरुन वाद झाले होते. झिशान सिद्दिकी यांनाही आत जायचं होतं, परंतु त्यांना जाऊ दिले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- नवाब मलिक यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; अटके पासून अंतरिम दिलासा नाही
- ‘मोदी सरकार आठ दिवसांत ९५ हजार ८२ कोटींचा निधी राज्यांना देणार’
- घरावरील हल्ल्यानंतर खुर्शीद यांची प्रतिक्रिया; म्हणाले,’हिंदुत्व काय करतं पहायचं असेल तर…’

