Share

विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांना वाढत्या महागाई बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच यावेळी कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं देखील गोखलेंनी समर्थन केल. यावरून सध्या त्यांच्या जोरदार टीका केली जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही विक्रम गोखले यांच्यावर निशाणा साधला आहे.

स्वरा भास्कर सोशल मिडियावर प्रचंड सक्रीय असते. अनेक विषयांवर ती भाष्य करते. अनेकदा या यामुळे ती अडचणीत देखील आली आहे. मात्र तिने विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केल्याप्रकरणी ट्विट करत लिहिले की, “पद्म पुरस्कार येत आहे”, यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत .

काय म्हणाले विक्रम गोखले?

विक्रम गोखले यांनी म्हणाले की, अनेक लोक हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का? यावेळी पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही, असेही विक्रम गोखले यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं देखील गोखलेंनी समर्थन केल. कंगना जे म्हणाली ते खरं आहे, मी त्या वक्तव्याचे समर्थन करतो. कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!