सिंधदुर्ग: जिल्हा नियोजन बैठक आज दिनांक १६ नोव्हेंबर रोजी पार पडली. या बैठकीनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राणे यांनी महावीकस आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. सिंधदुर्ग जिल्ह्याला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाते त्यावरून हे सरकार ग्रामीण भागाची दखल सुद्धा घेत नसल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दात नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
विकासाला चालना मिळेल असं काही राज्य सरकार करत नाहीये. जिल्हा नियोजन बैठक ही केवळ औपचारिकता असल्याचे राणे म्हणाले. जानेवारी नंतर आज ही बैठक घेतली आहे. सिंधदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक संकटाचा फार मोठा फटका बसला होता, अतिवृष्टी फटका बसला मात्र अजूनही निधी मिळाला नाही, आत्ता कुठे निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच सोबत बजेट हे जिल्हा नियोजनकडे नसल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे.
आधी पैसे जाहीर करायचे आणि नंतर ते धमकी देऊन मागून घ्यायचे, असा आरोप देखील राणे यांनी केला आहे. त्यामुळे सरकारची ग्रामीण विकासाबाबत कुठलीही ठोस भूमिका नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्य सरकार हिवाळी अधिवेशन घेण्याच्या देखील मनःस्थितीत नाहीये असं म्हणताना हे राज्य सरकार आजारी सरकार आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा आजारी असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘आम्ही या आरोपांकडे…’, भाजपा प्रभारींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर
- विक्रम गोखलेंच्या वक्तव्यावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया; म्हणाली…
- 28 युनियन आहेत, कुणाशी चर्चा करायची हे कामगारांनीच सांगावं- अनिल परब
- …त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले- झिशान सिद्दिकी
- अक्षय वाघमारे पुन्हा गाजवणार बिग बॉस; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

