मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या तीन वर्षाच्या देखभालीसाठी १५ कोटी ८७ लाख रुपयांच्या कंत्राटाला मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोणतीही चर्चा न करता सोमवारी ही मंजुरी देण्यात आली आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, मुंबईतील पेंग्विनच्या ३ वर्षाच्या देखभालीसाठी तब्बल १५ कोटी ८७ लाख रुपयांच्या कंत्राटाला स्थायी समितीत कोणतीही चर्चा न करताच मंजुरी देण्यात आली. ३ वर्षांपूर्वी दिलेल्या कंत्राटाच्या तुलनेत यंदा ४ ते ५ कोटींहून अधिक पैसे पालिका मोजणार आहे. बालहट्टाचा भुर्दंड मुंबईकरांच्या माथी. अशी टीका भातखळकरांनी शिवसेनेवर केली आहे.
मुंबईतील पेंग्विनच्या ३ वर्षाच्या देखभालीसाठी तब्बल १५ कोटी ८७ लाख रुपयांच्या कंत्राटाला स्थायी समितीत कोणतीही चर्चा न करताच मंजुरी देण्यात आली. ३ वर्षांपूर्वी दिलेल्या कंत्राटाच्या तुलनेत यंदा ४ ते ५ कोटींहून अधिक पैसे पालिका मोजणार आहे.
बालहट्टाचा भुर्दंड मुंबईकरांच्या माथी. pic.twitter.com/hiuMJoIImP— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2021
तीन वर्षांपूर्वी दिलेल्या कंत्राटाच्या तुलनेत यंदा चार ते पाच कोटींहून अधिक पैसे पालिका मोजणार आहे. दरम्यान, करोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत पेंग्विनवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशासाठी असा सवाल करत, भाजपने स्थायी समितीमध्ये जोरदार निदर्शने केली.
राणीबागमध्ये २०१७ मध्ये पेंग्विन आणण्यात आल्यानंतर ११ कोटी रुपये देखभालीचे कंत्राट हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. हा कंत्राट कालावधी संपल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदांना दोन वेळेस कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवण्यात आली. त्यामध्ये एकमेव हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांकरता विविध करांसह १५ कोटी ८७ लाख २८ हजार रुपयांचे हे कंत्राट आहे. दरम्यान, नवीन निविदेची प्रक्रिया पार पाडण्यापूर्वी याच कंत्राटदाराला सहा आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यासाठी ४५ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- IPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला
- भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अनिर्णीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

