जळगाव: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांच्या मुलाच्या लग्नात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मिश्किल जुगलबंदी पाहायला मिळाली.यावेळी ‘राज्यात शिवसेना-भाजप युतीचा गेल्या २५ वर्षापासून चांगला संसार सुरू होता. मात्र, जयंतराव आपण २५ वर्षाचा संसार मोडून टाकला’, असा खोचक टोला माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil)यांना लगावला.
यावरच जयंत पाटील यांनी देखील जोरदार उत्तर दिले आहे. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खदखद अद्यापही संपलेली दिसून येत नाही. त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या त्या ठिकाणी ही खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत आहे. मात्र गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला गांभीर्याने घेत नसून, त्यांच्या वक्तव्याला जास्त प्राधान्य देण्याची गरज नसल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान या विवाहसोहळ्यासाठी राज्य मंत्रीमंडळातील बऱ्याच नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील,परिवहन मंत्री अनिल परब यांसह अनेक नेते उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या:
- शशी थरूर यांच्या ‘त्या’ ट्वीटचा मिमी चक्रवर्तींकडून बचाव; म्हणाल्या..
- …या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान आहे- आनंद महिंद्रा
- ‘…याचा मला पश्चात्ताप आहे’, अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीविषयी फडणवीसांचे वक्तव्य
- IPL मधील टीम कायम राखण्यात येणाऱ्या खेळाडूंचा आज करणार फैसला
- भारत-न्यूझीलंड कसोटी मालिका अनिर्णीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

