नवी दिल्ली: येत्या १० मार्चला पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोलचे निकाल प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर लगेच भाजपमध्ये बैठकीचे सत्र सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट (Pramod Sawant Meets Modi) घेत मोठा दावा केला आहे.
“१० मार्चला निकाल लागेल आणि गोव्यात भाजप २० पेक्षा जास्त जागा जिंकेल. बहुतांश एक्झिट पोल हे गोव्यात भाजपाला अधिक जागा मिळणार असल्याचे दर्शवत आहेत. तसेच भाजपला प्रादेशिक पक्षाचा पाठिंबा मिळेल”, असा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे.
दरम्यान १० मार्चनंतर महाराष्ट्रातील मविआ सरकार कोसळणार असल्याचा मोठा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

