हेग: रशिया युक्रेन युद्धाचा आज १३वा दिवस आहे. गेले बाराही दिवस रशिया युक्रेनच्या विविध भागात हल्ले करत आहे. कधी बॉम्ब हल्ले तर कधी रॉकेट हल्ले, रशिया काही थांबायचे नाव घेत नाहीये. दोन्ही देशांमध्ये बैठकीची झाल्यात परंतु युद्ध काही थांबत नाहीये. शेवटी आता हे हल्ले थांबावे म्हणून युक्रेनने हेग येथील संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात धाव घेतली आहे. रशियाचे हल्ले ताबडतोब थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली आहे. न्यायालयाचे अध्यक्ष असलेले अमेरिकन न्यायाधीश जोआन डोनोग यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी नेदरलँड्सच्या रशियन राजदुतांनी आपल्या देशाला तोंडी सुनावणीमध्ये रस नसल्याचे न्यायालयाला कळवले आहे. त्यामुळे रशियाच्या अनुपस्थितीत खटल्याचे दोन दिवसांचे कामकाज सुरू झाले होते.
रशिया युक्रेनमध्ये झालेल्या बैठकीत रशियाने युक्रेनला तीन अटी घातल्या आहेत. या तीन अटी मान्य झाल्या तरच युक्रेनवरचा हल्ले थांबेवेल. संपूर्ण शरणागती पत्करा तरच युद्ध थांबेल, असा इशारा रशियाने युक्रेनला दिला आहे. परंतु युक्रेनने या अटी मान्य केल्या नसल्याचे दिसून येत आहे . त्यामुळे आता या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हल्ले सुरूच
यूक्रेनमधल्या विनिस्तिया एयरपोर्टवर रशियाने काल हल्ला केला. रशियाने 8 रॉकेटसच्या मदतीने विनिस्तिया एअरपोर्टला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर एअरपोर्टवर मोठी आग भडकली. त्यामध्ये संपूर्ण एअरपोर्ट जळून खाक झाला. या हल्ल्यानंतर युक्रेनची अतिमहत्त्वाची ठिकाणे रशिया जाणूनबुजून नष्ट करतेय, असा आरोप युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:


