मुंबई : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावरून आता चर्चा रंगू लागली आहे. तर राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असलेले तीनही पक्ष स्वबळाची तयारी करत आहेत. त्यातच शरद पवार व रणनीतीकर प्रशांत किशोर यांची भेट दिल्लीत नुकतीच झाली होती. शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील अशाही चर्चा सुरु आहेत. आता या सर्व चर्चा सुरु असतांना शरद पवार व पंतप्रधान यांच्या दिल्लीत भेटीने चर्चा सुरु झाल्या आहेत.
यापूर्वी ही पवारांनी पंतप्रधान मोदींच्या भेटी झाल्या आहेत. विशेष म्हणजे राज्यात आघाडीत बिघाडीचे प्रकार दिसू लागताच पवार दिल्लीत जाऊन वेगळाच राजकारणाचा डाव आखत असतात. आता गेल्या दोन दिवसापासून पवार दिल्लीत आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु होणार, त्यापूर्वी ही भेट झाली आहे.
केंद्राने सहकार क्षेत्रात आता लक्ष राहावं यासाठी नवीन सहकार खाते सुरु केले, राज्यात सहकार क्षेत्रात कोणाचा दबदबा चालत आलेला आहे. हे सांगण्याची गरज नाही. हे स्पष्ट आहे की भाजपला ही राज्यात आणि देशात सहकार क्षेत्रात आता मजबूत पकड करायची आहे, तर दुसरे कारण म्हणजे राज्यात महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणण्यासाठी हे खात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असावे अशा चर्चा आहेत,काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असलं तरी या भेटीचे असे अर्थ लावले जात आहेत.
पवारांच्या अशा भेटींचे परिणाम लगेच दिसले तरी काही काळानंतर याच परिणाम पाहायला मिळतात. दोन मोठे नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होणारच. पवार हे राष्ट्रपती झाले तर नवल वाटायला नको कारण कालच देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींची भेट घेतली होती. केंद्रात भाजपकडे बहुमत आहे. म्हणून राष्ट्रपती पदाचा निकाल काय लागणार हे सांगण्याची गरज नाही. कारण पवारांचा इतिहास जर आपण पाहिला तर सत्ता हेच त्यांचे मुख्य लक्ष्य आहे सर्वश्रूत आहे. त्यामुळे आजच्या या भेटीनंतर लवकरच मोठी राजकीय घडामोड घडणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाहीये.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळण रस्ता तयार, नितीन गडकरींनी दिली माहिती
- ‘मूठभर उद्योजकांची सौरऊर्जा प्रकल्पावर मक्तेदारी’, आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा
- व्यवस्थेला जेरीस आणू, पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही-विजय वडेट्टीवार
- मोदींच्या भेटीबाबत खुद्द शरद पवारांनी केला खुलासा, म्हणाले..
- ‘अमिताभ बच्चन हे मोदी सरकारच्या कामगिरीवर तर बोलत नाही ना?’, सत्यजित तांबे यांचे खोचक ट्विट


