Share

काय आहे किणी खून प्रकरण? ज्यावरुन राज ठाकरेंना आजही केलं जातेय टार्गेट

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सध्या किणी प्रकरणावरून निशाणा साधला जात आहे. यंदाच्या पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी भाजपचे कौतुक करत अनेक मोठे खुलासे केले. मात्र सत्ताधारी पक्षाकडून त्यांना ‘किणी फाईल’ वरून टार्गेट केले जात आहे. नेमके हे किणी प्रकरण काय आहे, ज्यावरून सध्या राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले आहेत.

तर रमेश किणी हे दादरला राहणारे रहिवाशी होते. १९९६ साली त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. रमेश किणी बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी पुण्यातील चित्रपटगृहात त्यांचा मृतदेह सापडला. बेपत्ता होण्याआधी रमेश किणी यांनी दादरच्या लक्ष्मी निवास इमारतीमधील त्यांचा फ्लॅट रिकामी करण्यास नकार दिला होता. रमेश किणी यांची पत्नी शीला यांनी इमारतीचा मालक फ्लॅट रिकामी करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता. लक्ष्मी निवास इमारतीचा मालक लक्ष्मीचंद शहा राज ठाकरेंचा जवळचा मित्र होता. त्यामुळे या प्रकरणात राज ठाकरे यांचे नाव समोर आले.

राज ठाकरेंनी दावा केला की या प्रकरणात त्यांचा कसलाही हात नाही. त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात यावी म्हणून त्यांचं नाव यात गोवलं जात आहे. केवळ त्याने आत्महत्या केली म्हणून मला अटक कशी काय करु शकता? असा सवाल त्यावेळी राज ठाकरे यांनी केला.ही केस सुप्रीम कोर्टात गेली. पण तिथेही तपासात काहीही निष्पन्न झाले नाही. जनतेच्या भावना रमेश किणी यांच्या मृत्यूबाबत अतिशय तीव्र होत्या म्हणून हायकोर्टाने हा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी सूचना केली होती. पोलिसांनी रमेश किणी यांच्या खिशात आत्महत्या करण्याबाबत लिहीलेली चिठ्ठी सापडली असे सांगितले. पुढे लक्ष्मीचंद शहा, त्यांचा मुलगा यांची कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. त्यावेळी शिवसेना सत्तेत होती. त्यामुळे राज ठाकरेंना मुक्तताच मिळेल असे म्हटले जात होते. त्यामुळे आजही या घटनेमुळे राज ठाकरेंना टार्गेट केले जाते.

हत्वाच्या बातम्या:

नगरसेवक वसंत मोरेंचा मनसेला रामराम? पक्षाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट!

IPL 2022 : सूर्य कुणीकडं उगवला..! दीपक हुडानं कृणाल पंड्याला म्हटलं ‘भाऊ’; वाचा सविस्तर!

“पैसे योग्य ठिकाणी गुजरातला तर…”, अमोल मिटकरींचा किरीट सोमय्यांवर निशाणा

“मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणारे महात्मा किरीट सोमय्या”; राऊतांचा टोला

वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेत नाराजीनाट्य

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!