पुणे: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भाषणावर नाराजी व्यक्त केली होती. मोरेंनी आपण बेचैन असल्याचे सांगितले.
ठाकरेंच्या या भाषणावर प्रभागातील काही मुस्लीम मतदार भयग्रस्त झाले आहेत, तसेच एका शाखाप्रमुखाने राजीनामा दिला असल्याचे अशी माहितीही वसंत मोरेंनी जाहीर केली. एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने देखील राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुण्यातील पक्षाचा राजीनामा दिला होता. तसेच राज्यातील अनेक मुस्लिम पदाधिकारी राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे नाराज असल्याचे दिसत आहेत.
याचबरोबर एक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे हे मनसेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडले. उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख हा ग्रुप होता. या पक्षबांधणीसाठी बनवलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मतभेद दिसून येत असल्याने तसेच चर्चा टाळण्यासाठी हा ग्रुप वसंत मोरेंनी सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
“मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणारे महात्मा किरीट सोमय्या”; राऊतांचा टोला
वसंत मोरे राष्ट्रवादीच्या वाटेवर ? राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेत नाराजीनाट्य
“…ही अन्यायकारक दरवाढ मागे घ्या”, काँग्रेसची मागणी
“२५ वर्ष मराठी माणसाच्या नावावर…”, निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा
“किरीटजी पत्रकार परिषदेतून पळून गेले, देशद्रोही…”, संजय राऊतांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

