Share

IPL 2022 : सूर्य कुणीकडं उगवला..! दीपक हुडानं कृणाल पंड्याला म्हटलं ‘भाऊ’; वाचा सविस्तर!

Published On: 

मुंबई : क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे खेळाडूंमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असतात. पण कधी कधी असंही घडतं की, मतभेदामुळे दोन क्रिकेटपटूंमध्ये अंतर निर्माण होतं. गेल्या वर्षी देशांतर्गत स्पर्धेदरम्यान सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दीपक हुडा आणि कृणाल पंड्या यांच्यात मतभेद झाले होते. यानंतर कृणालने त्याला संघाबाहेर टाकण्याची धमकी दिली. गेल्या वर्षी दीपक हुडा बडोद्याच्या संघाचा भाग होता. गुजरात क्रिकेट असोसिएशनला पाठवलेल्या ईमेलमध्ये दीपकने क्रुणालवर अनेक आरोप केले होते. दीपक हुडा आणि कृणाल पंड्या हे आयपीएल २०२२मधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहेत.

आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाल्यानंतर दीपक हुडा आणि कृणाल पंड्या खूप चर्चेत होते. मैदानावर हे दोन्ही खेळाडू एकमेकांशी बोलतील की नाही, अशी चिंता क्रिकेट चाहत्यांना होती. पण दोघांमधील मतभेदाचं अंतर कमी होताना दिसत आहे. दीपक यांच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे.

एका मुलाखतीत दीपक हुडानं कृणालसोबतच्या संबंधाबाबत वक्तव्य केले आहे. दीपक म्हणाला, ”तो म्हणाला तो माझा भाऊ आहे. भावांमध्ये भांडण होते. आम्ही एका संघात आहोत आणि एका उद्देशाने खेळत आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!