Share

काय आहे INS VIKRANT प्रकरण, सोमय्यांनी का केला होता निधी जमा? जाणून घ्या

Published On: 

मुंबई: राज्यात सध्या एक प्रकरण जाम चर्चेत आहे. ते म्हणजे INS विक्रांत घोटाळा प्रकरण. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत INS विक्रांत संदर्भात धक्कादायक खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. INS VIKRANT शी एक मोठा इतिहास जुडलेला आहे. प्रत्येक भारतीयाच्या भावना INS विक्रांतसोबत जुळलेल्या आहेत. मग हा घोटाळा नेमका काय? ही मोहीम नेमकी कोणती होती? त्यात किरीट सोमय्या यांचे नाव कसे समोर आले? याचाच एक तपशील जाणून घेऊयात.

INS VIKRANT इतिहास-

दुसऱ्या महायुद्धा दरभारतीय नौदलाचे जहाज विक्रांत हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-श्रेणीचे विमानवाहू जहाज होते. हे जहाज दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश रॉयल नेव्हीसाठी HMS हर्क्युलस म्हणून ठेवण्यात आले होते. परंतु युद्ध संपल्यावर ते थांबवण्यात आले. भारताने 1957 मध्ये अपूर्ण वाहक खरेदी केली आणि 1961 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. विक्रांतला भारतीय नौदलाचे पहिले विमानवाहू वाहक म्हणून नियुक्त करण्यात आले आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान विक्रांतने महत्त्वाची भूमिका बजावली.

विक्रांत १९९७ ला नौदलाच्या सेवतून निवृत्त झाली. युद्धनौका निवृत्त झाल्यावर युद्ध संग्रहालय बनवण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. विक्रांतच्या दुरुस्तीची जबाबदारी नौदलाबरोबर राज्य सरकारने उचलली. दुरुस्तीसाठी किंवा युद्धनौका तरंगण्यासाठी आवश्यक डागडुजीसाठी पैसे देण्याव्यतिरिक्त राज्य सरकारने काहीही केले नाही. १९९७ ते २०१३ राज्यातले आणि केंद्रातले सत्ताधारी बदलले तरी कोणत्याही सरकारने या युद्धनौकेचे कायमस्वरुपी युद्ध संग्रहालायत रुपांतर केले नाही. यामुळे अखेर नोव्हेंबर २०१४ ला आयएनएस विक्रांत ही भंगारात काढण्यात आली.

किरीट सोमय्या आणि INS विक्रांत संबंध काय?

२०१३ मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तत्कालीन काँग्रेस -राष्ट्रवादी सरकार विरोधात आंदोलन केले होते. ही युद्धनौका खाजगी भागीदाराला देत याचा व्यावसायिक वापर करण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला होता. लोकशाही आघाडी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर तेव्हा याचा व्यावसायिक वापर करण्याचे प्रयत्न राज्य सरकारने केले. हा एक प्रकारे २०० कोटींचा कमिशन घोटाळा असल्याचे त्यावेळी म्हटले जात होते. आयएनएस विक्रांतचे युद्ध संग्रहालय केलं जावं ती भंगारात काढू देणार नाही याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना किरीट सोमय्या यांनी पत्र लिहिले होते. यासाठी किरीट सोमय्या यांनी विक्रांत स्मारकासाठी मदत निधी गोळा मोहिम राबवली होती.

संजय राऊत यांचा INS विक्रांत संबंधी खुलासा-

आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे म्युझियममध्ये रूपांतर केले पाहीजे अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतली होती. यातही विशेषकरून भाजप नेते किरीट सौमय्या यांनी एक मोहीम सुरु केली. या मोहमेंतर्गत लोकवर्गणीतून २०० कोटी रुपये जमा करून राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द करू,असे सांगितले गेले. मात्र किरीट सोमय्यांनी ही वर्गणी राज्यपालांकडे दिली नसल्याचा खुलासा आरटीआयच्या माध्यमातून झाला आहे.

आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसे दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असे राऊत यांनी म्हटले आहे. विक्रांतशी देशातील नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. ते देशाच्या संरक्षण शक्तीचे एक प्रतिक आहे. त्याच्यामध्ये जर घोटाळा होत असेल तर हा देशद्रोह ठरतो. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

माजी सैनिकाची सोमय्यांविरोधात तक्रार दाखल-

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणी खुलासा केल्यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात किरीट सोमय्या यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सोबतच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.

किरीट सोमय्यांनी केले आरोपांचे खंडन-

किरीट सोमय्या यांनी आज (१२ एप्रिल) ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. “सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमे अंतर्गत फक्त ११ कोटी जमा करण्यात आले होते. १० डिसेंबर २०१३ साली आम्ही सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिम राबवली. मात्र आज १० वर्षांनंतर संजय राऊत म्हणत आहेत की, ५८ कोटी जमा झाले. यापूर्वीही संजय राऊत यांनी ७ आरोप केले आहेत. मात्र एकाचाही पुरावा मुंबई पोलिसांकडे नाही. १७ डिसेंबर २०१३ साली जेव्हा आपण राष्ट्रपती यांना भेटलो तेव्हा शिवसेना नेते गोपीनाथ मुंडेही सोबत होते. त्यामुळे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणे बंद होणार नाही. आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार.”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिला आहे.

सोमय्या पिता-पुत्रांचा जामीन अर्ज फेटाळला-

माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्या यांच्याविरोधात तक्रार केली होती.या प्रकरणी अटक होण्याच्या शक्यतेने सोमय्या आणि त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. न्यायालयाने सोमय्यांना दणका देत त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.तसेच नील सोमय्या यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांना कधीही अटक होऊ शकते.

दरम्यान कधीकाळी देशाच्या सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावलेल्या INS विक्रांत संबंधी या खुलास्याने सर्वांनाच धक्का बसला.अजून तरी हे प्रकरण मिटलेले नाही. आज सोमय्या पिता-पुत्रांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण अजून कोणते वळण घेते हे येणारा काळच ठरवेल.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 CSK vs RCB : आज धोनीची बॅट तळपणार? वाचा कोणत्या संघाचं पारडं आहे जड

सदावर्तेंनी घेतलेल्या रकमेमध्ये खोत आणि पडळकरांचाही वाटा आहे का?; राष्ट्रवादीचा सवाल

IPL 2022 : जेव्हा हार्दिकच्या तळपायाची आग मस्तकात जाते..! मॅचदरम्यान शमीवर काढला ‘असा’ राग; VIDEO व्हायरल!

“फक्त ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा…” , सुजात आंबेडकरांना मनसेचा जोरदार टोला

“यूपीए अध्यक्षपदासाठी जागा खाली नाही”; शिंदेंनी पवारांना डिवचलं

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!