नवी दिल्ली : २०२० हे वर्ष लवकरच संपणार आहे. व आता आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीखही जवळ आली आहे. आयटीआर दरवर्षी 30 जुलैपर्यंत दाखल करायची होती, परंतु यावेळी ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत लोकांना 6 महिन्यांपेक्षा जास्त वेळ मिळाला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आयटीआर दाखल करण्यास तुम्ही सक्षम नसाल तर घाबरून जाण्याचं काही काम नाही. चार्टर्ड अकाउंटंट सौरभ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत कोणतीही अडचण नाही.
जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करण्यास सक्षम नसाल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हो आता तुम्ही 31 डिसेंबर 2020 पर्यंत आयटीआर दाखल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे शक्य झालं नाही तर तुम्ही आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत फाइल करू शकता. मार्च अखेरपर्यंत तुम्ही आयटीआर दाखल करू शकता.
जर वेळेत तुम्ही आयटी भरू शकणार नसाल तर तुम्हाला दंड हा वेगवेगळ्या आयटीआरवर अवलंबून असतो. हा 1000 ते 5000 रुपयांपर्यंतही असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 31 मार्च 2021 पर्यंत दंड भरून आयटीआर भरावा लागेल.
महत्वाच्या बातम्या
- लग्ग्नानंतर नेहाने दिली एक गोड़ बातमी
- हिम्मत असेल तर गोळवलकर, हेडगेवार यांच्या नावाने निवडणुका लढवा; खरातांचे पडळकरांना आव्हान
- दाक्षिणात्य सुपरस्टार ‘धनुष’ आता हॉलिवूड सिनेमात दिसणार
- किरीट सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा 100 कोटींचा दावा करणार – सरनाईक
- शेतकरी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर संसदेचे एकदिवसीय अधिवेशन बोलाविण्याची राष्ट्रवादीची मागणी


