मुंबई : सामनाच्या अग्रलेखात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख केला. त्यानंतर आता पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पडळकर यांनी राऊतांना एक पत्रच लिहिलं असून चांगलाच पाणउतारा यात केला आहे. या पत्रात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? सडकून टीका पडळकर यांनी केली आहे.
या पत्रात गोपीचंद पडळकर म्हणतात की, मी आपणांस खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे उद्वोधन देऊन लिहू शकलो असतो, आपल्या दैनिकात माझा उल्लेख फेकूचंद केला यापद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही, प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे असं त्यांनी सांगितले.
मी अधिवेशनात धनगरी पेहराव करून गजी ढोल वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण व भटक्या विमुक्तांचे दुर्लक्षित प्रश्न सरकारच्या कानावर पडावेत असा त्याचा उद्देश, मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खाशी मी नाळ तोडलेली नाही, माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही तर हजारवेळा येईन, ते स्वातंत्र्य आपण आपल्या सरकारने दिलेले नाही ते स्वातंत्र्य मला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते, मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार, राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे, सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाजतरी कसा येणार असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, आता संजय राऊत यांचा बचाव करण्याकरित सचिन खरात अध्यक्ष आरपीआय (खरात) धावून आले आहेत. गोपीचंद पडळकरजी राष्ट्रीय नेते सर्वांचे असलेतरी भाजपा फक्त निवडणुकीसाठी अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल आणि भगतसिंग यांचा वापर करतो व निवडणुकीनंतर हेडगेवार, गोळवलकर आठवतात हिम्मत असेल तर गोळवलकर, हेडगेवार यांच्या नावाने निवडणुका लढवा असे खूले आव्हान त्यांनी दिले आहे.
तुमचे नेते देवेंद्र फडणवीस जी म्हणाले होते सत्ता आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ पण सत्ता आली फडणवीस मुख्यमंत्री झाले पाच वर्षातसुद्धा धनगर समाजाला आरक्षण दिले नाही पण आपण याच भाजप पक्षात आमदारकी मिळण्यासाठी प्रवेश केला आणि आमदारकी मिळवली यामुळे धनगर समाजाने आपल्याला आणि भाजपाला ओळखले आहे. आपल्याला जे बोलायला सांगितले आहे तेवढंच बोला नाही तर आमदारकी जाईल हे ध्यानात ठेवा असं देखील ते ‘महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…’, पडळकरांची राऊतांवर घणाघाती टीका
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमकेअर फंडाबाबत व्यवस्थित खुलासा करावा; राष्ट्रवादीची मागणी
- संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? पडळरांचे राऊतांना खरमरीत पत्र
- दरेकरांनी निधीची चिंता करू नये त्यासाठी आमचे अजितदादा खंबीर आहेत – निलेश लंके
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

