मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. शेतकरी नेत्यांशी अनेकदा चर्चादेखील करण्यात आली. तरीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे.
दरम्यान, गेले २२ दिवस देशातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असूनही सरकारचे डोळे उघडत नाहीत. कुठलाच निर्णय शेतकऱ्यांच्या बाजुने मोदी सरकार घेत नाही असा आरोप करतानाच पंतप्रधानांनी संसदेचे एकदिवसीय अधिवेशन बोलवावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा 100 कोटींचा दावा करणार – सरनाईक
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमकेअर फंडाबाबत व्यवस्थित खुलासा करावा; राष्ट्रवादीची मागणी
- संजय राऊतजी आपला पगार किती आणि आपण बोलता किती? पडळरांचे राऊतांना खरमरीत पत्र
- दरेकरांनी निधीची चिंता करू नये त्यासाठी आमचे अजितदादा खंबीर आहेत – निलेश लंके
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

