Share

पवार-ठाकरे भेटीत नेमकी काय चर्चा झाली ?

Published On: 

मुंबई : राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. एकीकडे अनिल देशमुखांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलाय. तर दुसरीकडे शरद पवारच नाराज असल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर पवार थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतली.

जवळपास २ तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे. पवार-ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. ही निवडणूक लवकरात लवकर झाली पाहिजे. असं आता शरद पवार यांना वाटतं आहे. त्यामुळे या बैठकीत याबाबत मंथन झाले असल्याची चर्चा आहे. सोबतच महाविकास आघाडीतील धुसफूस कमी करण्यासाठी या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

पुढील महिन्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विरोधक विविध मुद्द्यांवरुन घेणार असल्याचं लक्षात घेता राजकीय स्ट्रॅटेजी करण्यासाठी काय पावलं उचलावी यावरही चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे.विधिमंडळाचे अधिवेशन, अधिवेशनात चर्चेसाठी येणारे विषय, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसेच पेंद्रीय कृषी कायदा, कोरोनाची तिसरी लाट आदी विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेली ईडीची कारवाई आणि त्यांच्या दोन्ही पीएंना झालेली अटक यामुळे देशमुखांची अडचण वाढताना दिसत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीची सुरू असलेली कारवाईच्या संदर्भात भेटीत चर्चा  झाली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!