Share

विल स्मिथच्या पत्नीला नेमका कोणता आजार आहे? ज्यावरून ऑस्करमध्ये झाला वाद

Published On: 

मुंबई : जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर  पुरस्कार सोहळा तब्बल तीन वर्षांनंतर लॉस एंजिलिसमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेता विल स्मिथची सूत्रसंचालक क्रिस रॉक याच्याशी बाचाबाची झाली. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली.

क्रिस रॉकने G.I. Jane या चित्रपटावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. जेडाच्या टकलावरून रॉकने मस्करी केली. जेडाला टक्कल असल्यामुळेच तिला चित्रपटातील भूमिका मिळाली, असं तो म्हणाला. पत्नीची केलेली ही मस्करी विस स्मिथला अजिबात आवडली नाही. तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली. या सगळ्या प्रकारानंतर विल स्मिथच्या कृतीबद्दल आणि त्याच्या पत्नीच्या आजाराविषयी खूप चर्चा झाली. तिला अ‍ॅलोपेसिया  हा आजार आहे. या आजारामुळे तिचे केस गळतात. 2018 मध्ये पहिल्यांदा ती याविषयी बोलली होती.

अ‍ॅलोपेसिया एरिटा’ हा आजार नेमका काय आहे?

अ‍ॅलोपेसिया एरिटा हा आजार तुमच्या केसांवर सर्वाधिक परिणाम करतो. या आजारामुळे केस गळण्यास सुरूवात होते. या आजारात केसांच्या मुळांवर सर्वप्रथम हल्ला होतो.यामुळे केस झपाट्याने तुटतात आणि त्यामुळे टक्कल पडू लागतं. काहींच्या भुवयांवरचेही केस गळू लागतात. तसंच काहींच्या पापण्या आणि चेहऱ्यावरच्या केसांच्या बाबतीतही ही समस्या जाणवते.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022: संजू- बटलरच्या खेळीने राजस्थानची विजयी सुरुवात; सामन्यात रचले अनेक रेकॉर्ड्स

मी आमदार, खासदार जन्माला घालणारा माणूस – सदाभाऊ खोत

“त्यांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असता तर…”, ‘त्या’ प्रस्तावावरून भातखळकरांचा शरद पवारांना टोला

शरद पवारांकडे UPA चे अध्यक्षपद देण्याचा प्रस्ताव दिल्लीत मंजूर; राजकारणात मोठ्या घडामोडी

यंदा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात होणार साजरी; ठाकरे सरकारचा निर्णय

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!