🕒 1 min read
सांगली : २० जुलै पासून सलग ३-४ दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. २०१९ नंतर सलग दोन वर्षे कोरोनाचा धोका आणि त्यातच पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान यामुळे व्यवसायिकांसह पुरबाधित असलेले हजारो कुटुंब हे हतबल झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण, कोल्हापूर नंतर आज सांगली जिल्ह्यातील पुरबाधित भागांची पाहणी केली. सकाळी अकरा वाजल्यापासून सुरु झालेल्या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, सांगली शहर, आयर्विन पूल येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. यानंतर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तात्काळ मदतीसह दुरोगामी निर्णय आणि कोरोना स्थितीबाबत देखील भाष्य केलं.
कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यात देखील कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्याला साथ द्या असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा कठोर निर्णय नेमका काय असेल ? यावर भाष्य केलं आहे. ‘आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे हे काम सुरु झालं आहे. महापुराचं संकट वाढत आहे. घरांचं नुकसान, दुकानांचं नुकसान, वाहून गेलेले रस्ते, पूल, अशी कामं करण्याची गरज आहे. तसं यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागेल,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
आता कठोर निर्णय काय असेल यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘काही दिवसांचा-महिन्यांचा पाऊस हा काही तासात पडतोय. दरडी कोसळत आहेत. रस्ते खचत आहेत. तळीये गावात दरड कोसळून दुर्घटना घडली. निसर्गासमोर आपण हतबल असतो. नदीपात्रात पूररेषा, रेड लाईन, ब्लू लाईन वगैरे आहेत. त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्या ठिकाणी अतिक्रमण होता कामा नये.’
यासोबतच, ‘काही ठिकाणी वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. शहर आणि गावातील वस्त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. पाण्याला अडथळा असणारी बांधकामं दूर करावी लागणार आहेत. ते नाही केलं तर पूर संकटातून आपण कधीच बाहेर पडणार नाही. त्यासाठी तुमचं सहकार्य हवं,’ असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- शिवसेना भवन तोडू असे मूळ भाजपचे कार्यकर्ते आणि नेते म्हणणार नाही- संजय राऊत
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

