🕒 1 min read
मुंबई : आमदार प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर शिवसेना आणि भाजप शीतयुद्ध पहायला मिळत आहे. या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते निलेश राणे एकमेकांवर सोशल मिडीयावर जोरदार टीका करतांना दिसत आहे. तसेच शिवसेना भाजपचे इतर नेते कार्यकर्ते देखील सोशल मिडीयावर एकमेकांवर टीका करत आहे.
नुकतेच संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. शिवसेना भवन तोडू हे बोलणे रोगट लक्षण आहे, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ‘शिवसेना भवन तोडू हे बोलणे रोगट लक्षण आहे. ज्यांना मराठी अस्मितेची जाणीव आहे, ते असे बोलणार नाहीत. मूळ भाजपचे कार्यकर्ते आणि नेते असे म्हणणार नाहीत. बाहेरून आलेले बाटगे असे बोलतात,’ असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. अनेकदा तर शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरा-समोर आल्याचे दिसून येत आहे. या वादात आता आणखी भर पडली आहे. प्रसाद लाड यांनी थेट शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटलाय. त्यात आता नीलेश राणे यांनीही उडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हॉटेलला एकटी ये, रात्रभर थांब, तुझी लाईफ बनवतो’; ‘त्या’ अभिनेत्रीने केली दिग्दर्शक-निर्मात्याची पोलखोल
- लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
- पोर्नोग्राफीमधून पतीची आर्थिक चंगळ, तर शिल्पा शेट्टीला कोट्यवधी रूपयांचा तोटा
- ‘महापुरावर कायमस्वरुपी तोडगा काढणारच, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हे माझं वचन’
- विरोधक सभागृहात येऊन चर्चेत सहभागी होण्याऐवजी ते चर्चेपासून दूर पळत आहेत – भाजप


