Share

शिवसेनेने प्रतिष्ठेचा मुद्दा बनविलेला नाणार प्रकल्प नेमका आहे तरी काय ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमकिा घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

या पत्रानंतर पुन्हा एकदा नाणारचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत घेतलेल्या भूमिकेला खा. शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. शरद पवारांनी ठाकरे यांना फोन करून भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे असे सांगितले जात असल्याने या मुद्द्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

या प्रकल्पासाठी कोकणातील १५ हजार एकर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागण्याची शक्यता आहेसोबतच अनेक कुटुंबे विस्थापित होण्याची भीती आहे. हा प्रकल्प कोकण किनारपट्टीवर उभारण्यात येत असल्याने मच्छिमारांना देखील भीती वाटत आहे.मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रदूषमामुळे देखील या प्रकल्पाला विरोध होत आहे.

दरम्यान,’नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्यानेच तेथून प्रकल्प हटविण्यात आला असून, त्या ठिकाणी रिफायनरी न करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. रिफायनरीला नाणारऐवजी दुसरी पर्यारी जागा देणार आहे. मात्र, हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

दरम्यान, नाणार प्रकल्पासंदर्भात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे हित लक्षात घेऊनच आणि स्थानिकांना रोजगारसंधी लक्षात घेऊन या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले होते. पण, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्पाला प्रारंभी विरोध करण्याचेच धोरण शिवसेनेचे कायम राहिलेले आहे. आता राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांनी शरद पवार यांचाही पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. आता तीन पक्षांचा पाठिंबा असताना या प्रकल्पाचा मार्ग मोकळा व्हावा, अशी अपेक्षा आहे.

नाणार प्रकल्प नेमका आहे तरी काय ?

आशिया खंडातील सर्वांत मोठी रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरण प्रकल्प म्हणून नाणार प्रकल्पाकडे पाहिले जातआहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!