🕒 1 min read
मुंबई: सर्वसामान्यांना मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला होता, कारण एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसलेली असतानाच आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती २५ रुपयांनी वाढवल्या आहेत. चार दिवसांपूर्वीही एलपीजी गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ झाली होती.
यामध्ये देखील आता एक दिलासा देणारी ऑफर आली आहे. ज्यामध्ये तुम्ही 100 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळवू शकता जर तुम्ही पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुक केला तर तुम्हाला ते 100 रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला बुकिंगनंतर छोटेसे काम करावे लागेल. तुम्ही पेटीएमकडून एलपीजी गॅस सिलिंडर बुक केले तर तुम्हाला त्यासह स्क्रॅच कार्ड दिले जाईल, स्क्रॅचिंग केल्यावर तुम्हाला 100 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक किंवा शॉपिंग व्हाऊचर मिळू शकेल. कॅशबॅक मिळविण्यासाठी, आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत, त्यानंतर आपण घर बसल्या एलपीजी बुक करू शकता आणि कॅशबॅकचा फायदा देखील घेऊ शकता.
पेटीएम वरून एलपीजी बुकिंगवर कॅशबॅक मिळविण्यासाठी तुम्हाला पेटीएम अ;ॅपवर जाऊन लॉगिन करावे लागेल. यानंतर बुक गॅस सिलिंडर ऑप्शनवर जा आणि आपला गॅस प्रदाता (एजन्सी) निवडा, ज्यामध्ये भारत गॅस, एचपी गॅस, इंडेन असे बरेच पर्याय उपलब्ध असतील. मग ग्राहक क्रमांक किंवा मोबाइल नंबर किंवा एलपीजी आयडी लिहावा लागेल. आवश्यक तपशील भरल्यानंतर खालील ऑफरमध्ये 100 रुपयांच्या कॅप्शनचा पर्याय निवडा. यानंतर आपल्याला योग्य कॅशबॅक मिळेल. याचा फायदा आपण एलपीजी 100 प्रोमो कोडद्वारे घेऊ शकता.
एक युजर फक्त एकदाच याचा फायदा घेऊ शकतो आणि पहिल्यांदा सिलिंडर बुक केल्यावरच त्याचा फायदा मिळू शकेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी 500 रुपये देणे आवश्यक आहे आणि त्याची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत आहे. सिलिंडर बुक केल्याच्या 24 तासांत तुम्हाला स्क्रॅच कार्ड मिळेल, पण तुमचा केवायसी नसेल तर तुम्हाला कॅशबॅक ऐवजी गिफ्ट व्हाऊचर पाठवला जाईल.
महत्वाच्या बातम्या
- कन्नड भाषेत फलक दिसल्यास दुकान बंद करणार, शिवसेनेचा इशारा
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- मोहन डेलकर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी घेतली ओम बिर्ला यांची भेट
- अमेरिका रिटर्न महिला सरपंच देते मुलीच्या जन्मानंतर महिलांना २ दोन महिन्यांचे वेतन
- वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की ज्यामुळे त्यांना वाचवलं जात आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
