Share

सिरममधील आगीमागे नेमकं कारण काय ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

Published On: 

मुंबई : पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटमध्ये लागलेली आग अटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून इथं कुलींगचं काम सुरू आहे. या आगीत ५ लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

मुख्य म्हणजे या आगीचा कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पदानावर कुठलाही परिणाम होणार नाही. मांजरी येथील सिरम कंपनीतील नव्या इमारतीमध्ये आग लागली होती. याबाबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल अधिक माहिती दिली आहे. या नव्या इमारतीमध्ये वेल्डिंग सुरु होतं. यावेळी तिथे अधिक ज्वलनशील पदार्थ देखील होते. वेल्डिंग सुरु असताना ही दुर्घटना घडली व ज्वलनशील पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, ‘सुरुवातीला चार व्यक्ती अडकल्याची माहिती मिळाली होती. महापालिकेच्या अग्निशामन दलांनी वेळीच तिथे पोहोचून त्यांना वाचवलं. मात्र, आग विझवल्यानंतर शेवटच्या मजल्यावर गेल्यानंतर समजले तो मजला देखील पूर्ण जळून खाक झालेला आहे व तिथे होरपळून ५ जणांचा मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!