मुंबई – राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, हे वृत्त समोर येताच ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली होती.नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्याचं आणि कोकणाचं नेतृत्व केलंय. त्यांना पुरवलेली सुरक्षा काढून घेतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा देण्यात आली आहे. हा माजी मुख्यमंत्र्यांसोबत केलेला दुर्व्यवहार आहे. यापूर्वी राज्यात असं कधीही घडलं नाही,” अशी टीका माजी मंत्री भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती.
दरम्यान,एका बाजूला ठाकरे सरकार कठोर निर्णय घेत असताना आता नारायण राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात आता 12 सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहे.न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांचा शेतकरी आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा !’
- मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन
- मराठा उमेदवारांची ‘ती’ नियुक्ती रद्द करण्यासाठी एमपीएससीची सर्वोच्च न्यायालयात धाव !
- अडीच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या उद्योगपती जॅक मा यांच्याबाबत मोठी बातमी; वृत्तवाहिनीने पोस्ट केला व्हिडीओ
- चेन्नई सुपर किंग्जसोबतचा माझा प्रवास संपला; दिग्गज खेळाडूचं भावनिक ट्विट !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
