यवतमाळ : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. एलआयसी चौक ते शासकीय विश्रामगृह पर्यंत फुटपाथच्या मधोमध मोठे मोठे फलक लावण्यात आले आहेत. नगरपरिषदेच्या बाजार अधीक्षक यांनी हे अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम हाती घेऊन पाचकंदील चौक ते विश्रामगृहापर्यंत फलक काढून टाकले आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनी कसलीही खातरजमा करता नगरपालिकेच्या बाजार अधीक्षकासह तिघांना ताब्यात घेतले आहे.
मुख्याधिकाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून बाजार अधीक्षक काम करत असतो. नगरपरिषद क्षेत्रातील जाहिरात फलकाचे नियमन व कारवाई हा पूर्ण अधिकार बाजार अधीक्षकाचा आहे. शहरात अनधिकृत जाहिरात फलकामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोबत चौकाचे विद्रुपीकरण झाले आहे. त्याची दखल घेऊन बाजार अधीक्षकांनी फलक हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. गृहमंत्री येतायत म्हणून त्यांच्या स्वागताचे फलक मनमर्जीने जागा मिळेल तिथे लावण्यात आले होते. हा प्रकार पाहून नगरपालिकेच्या मोहिमेत सर्व फलक काढून टाकले. पण यानंतर अनेकांचा इगो दुखावला आहे.
गृहमंत्री येणार आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची पोलिसांकडून पायमल्ली होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शहरातील फलकबाजीला आळा घालण्यासाठी खुद्द पालिका क्षेत्रातील ठाणेदार, मुख्याधिकारी व दंडाधिकारी यांची संयुक्त समिती आहे. याकडे कानाडोळा करून राजकीय दबावाला बळी पडत कायदेशीर कारवाई करणाऱ्या बाजार अधीक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याचा प्रकार घडला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सीरमला आग लागली की लावली, चौकशी झाली पाहिजे- प्रकाश आंबेडकर
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- अर्नब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा, उद्या कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- सिरम इंस्टिट्युटमध्ये आग; अदर पुनावाला यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

