पुणे : पुण्याच्या सीरम इंस्टिट्युटमध्ये लागलेली आग अटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाकडून इथं कुलींगचं काम सुरू आहे. या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
मुख्य म्हणजे या आगीचा कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पदानावर कुठलाही परिणाम होणार नाही. या इमारतीमध्ये कोव्हिशील्ड लशीचं उत्पादन सुरू नव्हतं.जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
साधारण पावणे तीनच्या सुमारास ही आग लागली होती. त्यानंतर अग्निशामन विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सधारण 4 वाजून 10 मिनिटांनी ही आग अटोक्यात आली आहे.
Thank you everyone for your concern and prayers. So far the most important thing is that there have been no lives lost or major injuries due to the fire, despite a few floors being destroyed.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021
दरम्यान, सिरम इन्स्टिट्युटच्या इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जिवित हानी झालेली नाही. कोणीही जखमी झाले नाही़ मात्र, इमारतीतील काही मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती अदर पुनावाला यांनी ट्वीट करुन दिली आहे. इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढणे याला आम्ही महत्व देत आहोत, असे त्यांनी कळविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- बार्शीत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा अपेक्षाभंग तर अपक्ष आमदाराचा करिष्मा !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- आयडिया-व्होडाफोन (VI) ने आणला जिओ, एअरटेलला मागे टाकणारा रिचार्ज प्लान !
- ‘बाळासाहेबांचे पुत्र मुख्यमंत्री असताना औरंगाबादचं संभाजीनगर होत नाही हे दुर्दैव आहे’
- सिरम मधील आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने आपत्कालीन उपाययोजना राबवा – मुख्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

