मुंबई : लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर तीन महिन्याची सवलत देण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. तर, मनसेसह भाजपने देखील आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरून वाढीव वीजबिल मागणीसाठी आंदोलन केलं होतं.
दरम्यान, कोरोना काळातील वीजबिलांची थकबाकी प्रचंड वाढल्याने आता वसुलीची मोहीम सुरू करत पैसे न भरणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय पक्षांकडून विरोध सुरू झाला आहे. वाढीव वीज बिलाबाबत काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांचे कौतुक केले आहे. सरकारने वाढीव वीज बिला बाबत जनतेला सवलत दिली नसल्याने विरोधक सरकारवर टीका करत आहेत.
थकबाकीदार ग्राहाकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा दिलेला एकतर्फी आदेश मागे घेतला जावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहूनवीजबिलावरून जनतेचा उद्रेक होईल असा इशाराच दिला आहे.
‘कोरोना काळात हजारो, लाखोंची वीज बिलं पाठवून झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी सरकार सक्तीने, दंडेलशाहीने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार असेल तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.’ असा इशारा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे दिला आहे. ‘अगोदर महावितरणने तक्रारींचा निपटारा करताना किती ग्राहकांना, किती रकमेची वाढीव बिले कमी करुन दिली. याचा हिशेब जनतेला द्यावा, तोपर्यंत सक्तीची वसुली करता येणार नाही. असेही प्रवीण दरेकर यांनी म्हंटले आहे.
कोरोना काळात हजारो,लाखोंची वीज बिल पाठवून झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी सरकार सक्तीने,दंडेलशाहीने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार असेल तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. अगोदर महावितरणने तक्रारींचा निपटारा करताना किती ग्राहकांना,किती रकमेची वाढीव बिले कमी करुन दिली pic.twitter.com/NPtf1P7dJD
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 21, 2021
महत्वाच्या बातम्या
- विनापरवाना ऊसगाळप केल्याने उस्मानाबादमधील जयलक्ष्मी शुगर्सला 35 लाखांचा दंड
- शरद पवारांचा एक फोन आणि इंडियाचं विमान मुंबईत लँड
- ‘वाटले होते गड्या आपला गाव बरा, पण तुम्ही म्हणले पसारा भरा’, पराभूत उमेदवाराचे अजब बॅनर
- …म्हणून अजूनही व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे
- गुड न्यूज : जिओने बदलला ‘ हा ‘ रिचार्ज प्लॅन…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

