Share

नववर्षाच्या पहिल्या दिवशी १० कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान देणार पीएम किसानचा हप्ता

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षानिमित्त १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता वर्ग करणार आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मोदींचे आभार मानले आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, ‘पंतप्रधानांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस अन्नदात्याला समर्पित करत पीएम किसान योजनेचा २,००० रुपयांचा १० वा हप्ता नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद नरेंद्र मोदीजी’, असे ट्विट भातखळकरांनी केले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजेनेचा दहावा हप्ता (PM Kisan 10th Installment) शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. यात १० कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत.

पंतप्रधान ट्विट करत म्हणाले, ‘नववर्ष, २०२२ चा पहिला दिवस देशातील अन्नदात्यांना समर्पित राहील. दुपारी १२:३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम-किसानचा १० वा हप्ता जारी करण्याचे भाग्य लाभेल. याअंतर्गत २० हजार कोटी रुपयांच्या हस्तांतरणामुळे १० कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे.’ अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!