🕒 1 min read
पुणे : दरवर्षी १ जानेवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असून यंदाच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे हे २०४ वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केले आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’आपल्या शूरवीर सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भीमा नदीच्या तीरावर उभारलेला ‘क्रांतीस्तंभ’ खरंतर केवळ स्तंभ नाही तर लाखो करोडो लोकांना अन्याय अत्याचाराविरोधात बुलंदीने ताकदीने उभे राहण्यासाठी ऊर्जा देणारे स्त्रोत आहे’, असे आव्हाड म्हणाले आहेत.
आपल्या शूरवीर सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भीमा नदीच्या तीरावर उभारलेला क्रांतीस्तंभ
खरंतर केवळ स्तंभ नाही तर लाखो करोडो लोकांना अन्याय अत्याचाराविरोधात बुलंदीने ताकदीने उभे राहण्यासाठी ऊर्जा देणारे स्त्रोत आहे
विनम्र अभिवादन#जयभीम#भीमा_कोरेगाव pic.twitter.com/5ngBBST3ow— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 1, 2022
दरम्यान, कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. यामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक असून ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होते. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, तसेच त्यात काही युरोपियन सैनिकही होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होते. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत होऊन पेशवाई साम्राज्याचा अस्त झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
