मुंबई: दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. असे असले तरीही जगभरात २०२२ चे स्वागत अतिशय जल्लोषात आणि नवीन आशेने केले आहे. देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक संकटं येऊन गेली. समाधान याचे की आपण सारे सोबत होतो. नव्या वर्षाचे स्वागत करताना, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देताना ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की येणारे वर्ष सर्वांना मांगल्याचे, सुख-समृद्धीचे, उत्तम आरोग्यदायी जावो! अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
अनेक संकटं येऊन गेली.
समाधान याचे की आपण सारे सोबत होतो.
नव्या वर्षाचे स्वागत करताना, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देताना ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की येणारे वर्ष सर्वांना मांगल्याचे, सुख-समृद्धीचे, उत्तम आरोग्यदायी जावो ! #HappyNewYear #NewYear2022 pic.twitter.com/s0wEyfBt4K— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 1, 2022
दरम्यान, नववर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनीही नव्या वर्षाचा पहिला दिवस हा अन्नदात्याला समर्पित केला असून पीएम किसान योजनेचा २,००० रुपयांचा १० वा हप्ता नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरी कशी झाली? धक्कादायक कारण आले समोर
- “चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब…याला अक्कल…”, नारायण राणेंचा अजित पवारांना टोला
- राष्ट्रपतींना पडली ‘समुद्रफळाची’ भुरळ; राष्ट्रपती भवनाने मागितली माहिती
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या


