Share

मृत्यूपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपाली चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय?

Published On: 

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपाली चव्हाण यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. मृत्यूपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपाली चव्हाण यांनी त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या त्रास व्यक्त केलेला आहे.

मृत्यूपूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपाली चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय?

  • ऑक्टोबर २०२०मध्ये आपण आमझरी दौऱ्यावर असताना प्रेग्नंसीमुळे मी ट्रेक करु शकत नव्हते. याबाबत मी पियूषा मॅडमला सांगितले आणि घरी निघून गेले. पण यानंतर सलग तीन दिवस मला भाकूरमध्ये कच्च्या रस्त्यातून फिरवण्यात आले. त्यामुळे माझा गर्भपात झाला. पण त्यातसुद्धा मला सुट्टी दिली नाही. माझे सासर अमरावतीत आहे. पण महिन्यातून एकदाही मला घरी जाता येत नाही.
  • रात्री बेरात्री कुठेही भेटायला बोलवतात. अश्लील भाषेत बोलतात. मी याआधीही तुमच्याकडे तक्रार केली होती. पण तुम्ही तुमच्या अधिकाऱ्याची बाजू घेणार हे मला माहिती होती. त्यामुळे मी माझ्याच बदलीचा विचार करत होते. मेळघाट ही अशी दलदल आहे जिथे आम्ही आमच्या मर्जीने येऊ तर शकतो पण तुमच्या मर्जीशिवाय बाहेर जाऊ शक नाही. याच दलदलीत मी अडकत चालले आहे.
  • माझ्या रेंजमधील सर्व काम करुनही मला अद्याप याचे पैसे मिळाले नाहीत. मी मेडिकलवरुन कामावर रुजू होत नव्हते पण तुमच्यामुळे रुजू झाले. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी बोलाल असे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचा माझ्यावरचा राग वाढत चालला.
  • धूळघाट गॅरेजमधून माझी बदली हरिसालला झाली होती तेव्हा मी खूप खूश होती. कारण माझ्यावर चौकशी सुरू असून देखील तुम्ही मला तुमच्याकडे घेतले होते. पण आमच्यातीलच काही कर्मचाऱ्यांनी माझे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांचे कान भरायला सुरुवात केली व साहेब इतक्या हलक्या कानाचे आहेत की कोणत्याही गोष्टीची खातरजमा न करता मला वारंवार निलंबित करण्याची व चार्जशीट करण्याची धमकी देऊ लागले.
  • माझ्याकडे गावांचे पुनर्वसन सुरू आहे. साहेबांनी कधी स्वतःहून गावात येऊन सभा घेतली नाही कधी क्षेत्रीय दौऱ्यासाठी गावात भेट दिली नाही. त्यांनी मला लोकांसमोर शिव्या दिल्या व पुनर्वसनमध्ये काय त्रास होत आहे याबाबत त्यांनी कधीच माझी बाजू ऐकून घेतली नाही. नेहमी नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडले ते फक्त आणि फक्त मला कमी दाखवण्याचे कारण शोधत राहायचे.
  • १७ मार्च २०२० रोजी मांगी येथील अतिक्रमणाबाबत त्यांनी मला फोन करून तू आत्ताच जाऊन अतिक्रमण काढ. आरोपीला ताब्यात घे, अतिक्रमण हटवताना तेथील स्थानिकांनी मला शिवीगाळ करून आम्हाला कोंडून ठेवले होते. याबाबत फोन करून व वायरलेसद्वारे सूचना देऊनसुद्धा ‘आरएफओ तुम झूट बोल रही हो नाटक कर रहे हो.’ असे ते म्हणाले. गावकरी माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करणार आहेत अशी मी त्यांना कळवले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘मैं खुदही बोल के तुम्हारे उपर अॅट्रोसिटी लगाता हूं, चार महीने जेल मे रखे तो कैसे लगता है वो देखता हूं.’ असं शिवकुमार मोबाइलवरुन मला बोलले. याचं माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे. ही रेकॉर्डिंग मी अमरावतीच्या खासदार नवनीत मॅडम यांनादेखील ऐकवली आहे.
  • ॲट्रॉसिटीमध्ये बेल न झाल्याने मी सुट्टीवर राहिले व तुम्हाला सगळ्यांना माहीत होते वेळोवेळी कोर्टाच्या निकालाबद्दल मी तुम्हाला देखील कळविले होते. पण सरांनी मला रुजू करून घेण्यास नकार दिला. तसेच माझी रजा कालावधी मधील सुट्टी ना करण्याची शिफारस केली. असे पत्र आपल्या वरिष्ठांना त्यांनी लिहिले.’ असे गंभीर आरोप दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये केले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!